डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालेल्या अतुल परचुरेंनी बालरंगभूमीपासूनच अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. रंगभूमीबरोबरच छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी – हिंदी मिळून त्यांनी ४० पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. काही काळापूर्वी कर्करोगाशी सामना करुन ते त्यातून यशस्वीपणे बाहेर पडले होते. तरुण तुर्क म्हातारे अर्क, वासूची सासू, प्रियतमा, या नाटकातल्या त्यांच्या भूमिका  विशेष गाजल्या. नवरा माझा नवसाचा, नारबाची वाडी, बुढ्ढा होगा तेरा बाप  हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. परचुरे यांच्या निधनामुळं मराठी हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परचुरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा