अभिनेता अल्लू अर्जूनची हैदराबादच्या चंचलगुडा केंद्रीय तुरुंगातून आज सकाळी सुटका करण्यात आली. पुष्पा टू सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अर्जुनला काल अटक झाली होती. त्यानंतर सायंकाळी तेलंगण उच्च न्यायालयानं त्याला चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला. दरम्यान, पुष्पा टू सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी संध्या चित्रपटगृहात झालेली दुर्घटना ही राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थेसंबंधीची बाब असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. काँग्रेसला कला क्षेत्राविषयी आदर नाही हेच अल्लू अर्जुनच्या अटकेतून सिद्ध झालं, अशी प्रतिक्रिया वैष्णव यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली.