पुष्पा २ या चित्रपटाच्या खेळादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी आज तेलुगु अभिनेचा अल्लू अर्जुन याला अटक केली आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबाद इथल्या एका चित्रपटगृहात पुष्पा -२ या चित्रपटाच्या प्रिमिअर खेळा दरम्यान चेंगराचेंगरी सदृष स्थिती निर्माण झाली होती. या खेळाच्या वेळी उपस्थित असलेल्या अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ती अनियंत्रित झाल्याने एकच गोंधळ उडाला. या खेळादरम्यान चित्रपटाची टीम उपस्थित राहणार असल्याची पूर्व सूचना पोलिसांना देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Site Admin | December 13, 2024 3:28 PM | Allu Arjun