डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘राज्यातल्या १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार’

राज्यातल्या एक हजार महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या करता आतापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी अर्ज केल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. 

 

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांवर येत्या ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार कालसुसंगत तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षण महाविद्यालयीन युवक युवतींना देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी या केंद्रांची स्थापना होत आहे. या प्रशिक्षणासाठी १५ ते ४५ अशी वयोमर्यादा आहे. यातल्या प्रत्येक केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती लोढा यांनी यावेळी दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा