कर्नाटकातल्या सराफा व्यापाराची ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना परभणी स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातल्या सराफा व्यापाऱ्याला सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवत आरोपी त्याच्याकडून १० लाखांची रोकड घेऊन पसार झाले. पोलिसांनी आरोपींना कुंभारवाडी परिसरातून ताब्यात घेतले असून पुढचा तपास सुरू आहे.