पश्चिम बंगालमधल्या आर जी कार रुग्णालयातील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला देहदंडाची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवरील निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने आज राखीव ठेवला.
न्यायमूर्ती देबांशु बसक आणि मोहम्मद सब्बार रशिदी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राज्य सरकारला या प्रकरणात याचिका करण्याचा अधिकार नाही असं सांगत सीबीआयने याचिकेला आव्हान दिलं आहे. याआधी सीबीआयने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सत्र न्यायालयात केली होती. मात्र हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ नसल्यामुळे न्यायालयाने मागणी फेटाळली होती.