वाशिम इथं झालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली आहे. अमरावती विभागीय पोलिसांसह वाशिम, यवतमाळ आणि अकोला पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली.
यासाठी पोलिसांच्या पथकाला ७० हजार रुपयांचं बक्षिसही देण्यात आलं. अमरावती विभागीय पोलिस महानिरीक्षक रामदास पोकळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ९ जानेवारीला विठ्ठल कृषी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांजवळून रक्कम या आरोपींनी लुटली होती.