बुलडाणा जिल्ह्यातल्या नागपूर मुंबई महामार्गावर नांदुरा शहरालगत आज सकाळी ट्रॅक्टर आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी झाले. हा ट्रॅक्टर कापूस वेचणीसाठी जाणाऱ्या मजुरांची वाहतूक करत होता. जखमींना मलकापूर तसंच खामगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
Site Admin | October 29, 2024 7:25 PM | बुलडाणा अपघात
बुलडाण्यात नागपूर मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात २ जणांचा मृत्यू, तर ८ जण गंभीर जखमी
