१९ वर्षाखालच्या क्रिकेटमधे, मलेशियात क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं अ-गटातल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानच्या महिला संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव भारतानं ७ बाद ६७ वर रोखला. सोनम यादवनं ४ षटकात फक्त ६ धावा देत ४ बळी घेतले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कमलिनी आणि सानिका चाळके यांनी तडाखेबंद भागीदारी करत ७ षटकं आणि ५ चेंडूत भारताला विजय मिळवून दिला. कमलिनीनं २९ चेंडूत ४४ धावा केल्या. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. सानिकानं नाबाद १९धावा केल्या.
भारताचा यानंतरचा सामना येत्या मंगळवारी नेपाळशी होणार आहे.