मुघल शासक औरंगजेबाचा बचाव करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या प्रारंभी मुंबईत पत्रकारांशी बोलताना आझमी यांनी हे वक्तव्य केल्यानं हा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
Site Admin | March 4, 2025 1:29 PM | Abu Azmi
आमदार अबू आझमी यांच्याविरोधात FIR दाखल
