उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभमेळयात काल मकरसंक्रांतीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं. या महाकुंभ मेळयात भाविकांना भाषेचा अडसर होऊ नये म्हणून ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘भाषिणी’मंच उपलब्ध करून दिला आहे. यात अकरा भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.