कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे यांनी दिली. कुंभ मेळ्याबाबत दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते…
सगळ्या जातीचे, सगळ्या संप्रदायाचे सर्व लोक एकत्र येऊन एका ठिकाणी स्नान करणं, याच्यासारखी जगात मोठी समरसता कुठेच नाही. सगळे भारतातील संप्रदाय त्या तिथे स्नानाला येतात. आपल्या देवगिरी प्रांतातून विविध संप्रदायाचे शंभर साधू यावेळी जाणार आहेत. आपण देवगिरी प्रांतातर्फे भगवे वस्त्र दोन हजार साधुंना तिथे प्रदान करणार आहोत.
बारगजे यांची ही मुलाखत आज सकाळी दहा वाजून ४५ मिनिटांनी आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक कार्यक्रमात आपण ऐकू शकता.
Site Admin | January 15, 2025 10:49 AM | कुंभ मेळा | देवगिरी
कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना
