ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०२३-२४ या हंगामातले ९५ टक्क्यापेक्षा जास्त थकित पैसे दिल्याचा दावा सरकारने केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. शेतकऱ्यांची थकित रक्कम देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१-२०२२ ची ९९ पूर्णांक ९ दशांश टक्के आणि २०२२-२०२३ ची ९९ पूर्णांक ६ दशांश टक्के थकित रक्कम देण्यात आली आहे, तसंच कारखानदार शेतकऱ्यांना उसाचे पैसे नियमितपणे देत असल्याचं बंभानिया यांनी सांगितलं.
Site Admin | August 7, 2024 6:21 PM | Nimuben Bambhaniya | sugarcane farmers