श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज ७५ ते ८० टक्के मतदान झालं. निवडणूक नियमांच्या उल्लंघनाच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं. टपाली मतांच्या मोजणीपासून मतमोजणीला सायंकाळपासून सुरुवात झाली आहे. टपाली मतांचा निकाल आज रात्रीपर्यंत तर अंतिम निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली.
राष्ट्राध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत आहे. रानिल विक्रमसिंघे, अनुरा कुमार दिसनायके आणि साजित प्रेमदासा यांनी आर्थिक अस्थिरता आणि भ्रष्टाचारासारख्या मुद्द्यांवर प्रचार केला आहे. निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवार रिंगणात आहेत.