विधान परिषदेच्या ४ जागांसाठी आज मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात ५२ पूर्णांक १८ शतांश टक्के, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ७३ पूर्णांक ३६ शतांश टक्के मतदान झालं होतं.
कोकण पदवीधर मतदारसंघात ५९ पूर्णांक ३१ शतांश टक्के, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात ७० टक्के पेक्षा जास्त मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नाशिकमधे २१ उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांना पसंतीक्रमानुसार मते देण्यास वेळ लागत असून अंतिम आकडेवारी उशिरा उपलब्ध होईल असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं. नाशिक शहरात बी डी भालेकर मैदानात मतदारांना पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. मतमोजणी १ जुलै रोजी होणार आहे.