डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 9, 2025 1:18 PM | AB-PMJAY Yojana

printer

कामगारांना AB-PMJAY योजनेचे लाभ मिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन

कामगार मंत्रालयानं तात्पुरत्या आणि ऑनलाइन पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. देशातील ३१ हजारांहून अधिक सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये एबी- पीएमजेएवाय योजनेअंतर्गत प्रति कुटुंब ५ लाख रुपये द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आरोग्य सेवांसाठी मिळू शकतात. २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे. २०२४-२५ मध्ये एक कोटीहून अधिक कामगारांना रोजगार मिळण्याचा अंदाज असून २०२९-३० पर्यंत अशा कामगारांची संख्या २ कोटी ३५ लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा