डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अन्नप्रक्रीया उद्योगातली कंपनी एबी इन बेव भारतात २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार

अन्नप्रक्रीया उद्योगातली कंपनी एबी इन बेव ने भारतात २५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्नप्रक्रीयाउद्योग मंत्री चिराग पासवान यांनी या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर दावोस इथं जागतिक गुंतवणूकदार परिषदेदरम्यान चर्चा केल्यावर ही माहिती दिली. देशाच्या विविध भागात या प्रकल्पाच्या आस्थापना असतील आणि तो येत्या २ ते ३ वर्षात पूर्ण होईल असं ते म्हणाले. अन्नप्रक्रीया उद्योगात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून त्याने रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दावोसमधे स्विस फेडरल रेल्वेच्या प्रतिनिधीमंडळाशी चर्चा केली. रेल्वे सुरक्षा तंत्रज्ञान आणि देखभालीच्या आधुनिक पद्धती या विषयावर यावेळी चर्चा झाली. त्यानंतर वैष्णव यांनी सेंट मार्ग्रेथ इथल्या रेल्वे कोच निर्मिती कारखान्याला भेट दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा