डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनाही आता आयुर्वेदाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्यात प्रवेश मिळणार

अन्य राज्यातून बी ए एम एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित ८५ टक्के तसंच खाजगी विना अनुदानित ७०टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा