पेरूमधील लिमा इथे सुरू असलेल्या जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या आरतीनं काल १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. चीनच्या झुओमा बैमा हिनं सुवर्ण तर चीनच्याच मेलिंग चेन हिनं रौप्य पदक पटकावलं. आरतीने ४४ मिनिट ३९ पूर्णांक ३९ शतांश सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम नोंदवत ही स्पर्धा पूर्ण केली. यावर्षी मार्च महिन्यात लखनौ इथे झालेल्या नॅशनल फेडरेशन कप अंडर-२० चॅम्पियनशीपमध्ये तिनेच नोंदवलेला ४७ मिनिटे २१ पूर्णांक ४ दशांश सेकंदांचा विक्रम या वेळी मोडीत काढला.
Site Admin | August 31, 2024 1:37 PM | Arti | ॲथलेटिक्स