दिल्लीत गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेबाहेर निदर्शनं केली. दिल्लीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना कराव्यात असं पक्षाचे नेते संजय सिंह यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
तसंच पंजाबमधल्या काँग्रेस खासदारांनीही आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. भारतीय अन्न महामंडळ किमान आधारभूत किमतीत पिकांची खरेदी करत नसल्याचा आरोप पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं पिकांची विक्री करावी लागत आहेस, असं त्यांनी यावेळी म्हटलं. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.