हरियाणातल्या आगामी विधानसभा निडवणुकीसाठी आम आदमी पार्टीने आज दोन याद्या जाहीर केल्या असून यात २२ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात प्रेम गर्ग हे पंचकुला मतदारसंघातून, कमल बिसला फतेहबादमधून, केतन शर्मा अंबालामधून आणि धीरज कुंदु दादरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नूह इथून रबिया किडवई, तर जगधरीमधून आदर्शपाल गुज्जर निवडणूक लढवणार आहेत. तर काल जाहीर केलेल्या पाचव्या यादीत नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात अनिल रंगा, दलजित सिंह, कौशल शर्मा यांच्या नावांचा समावेश आहे.
Site Admin | September 12, 2024 1:30 PM | AAP | Haryana Assembly elections