नागपूर इथल्या महिलांनी सुरू केलेल्या सहकारी पतसंस्थेचं यश हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे झालेला सकारात्मक बदल आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे सांगितलं.
ही पतसंस्था तीन हजार महिलांनी एकत्र येऊन स्थापन केली असून ती भक्कमपणे उभी असल्याचं तटकरे म्हणाल्या. महिला आणि बालविकास विभागाच्या माविम आणि इतर उपक्रमांसोबत या पतसंस्थेला जोडून त्यांना मदत केली जाईल, असं आश्वासन तटकरे यांनी दिलं.