नाशिक इथं आदिवासी विद्यापीठ सुरू केलं जाईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितलं. त्यांनी आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या उत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्यानं या विद्यापीठातल्या विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आदी उपस्थित होते.