संस्कृती आणि नागरीकरणाची परंपरा अनेक शतकांपासून उज्जैनमध्ये अस्तित्वात होती, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. उज्जैनमध्ये आज सफाई मित्र संमेलनाला त्यांनी संबोधित केलं. उज्जैन – इंदूर ६ पदरी महामार्गाचं आभासी माध्यमातून त्यांनी भूमीपूजनही केलं.
गेल्या १० वर्षात स्वच्छता अभियान राष्ट्रव्यापी झालं असून त्यातून देशात मोठे बदल दिसून आल्याचं त्या म्हणाल्या. मध्य प्रदेशातली अनेक शहरं सफाई मित्र सुरक्षित शहरं म्हणून जाहीर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.