पुणे शहरात एकंदर तीन लाख ७४ हजार १४८ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पुणे महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आलेल्या ४५ हौदांमध्ये एक लाख १ हजार २८१ मूर्तींचं तर ५१६ लोखंडी टाक्यात एकंदर दोन लाख ८२ हजार ६०४ मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. महापालिकेनं मूर्ती दान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून २३९ ठिकाणी उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रात एक लाख ७६ हजार ६७ मुर्ती दान करण्यात आल्या आहेत. घनकचरा विभागाचे प्रमुख आणि महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.
Site Admin | September 18, 2024 7:12 PM | Ganpati Visarjan