भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
Site Admin | February 5, 2025 4:16 PM | बैठक | मुंबई | मुद्रा नीती समितीची बैठक | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू
