जम्मू आणि काश्मीरमध्ये, कठुआ हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी 20 हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, तर आज चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आलं होतं. घनदाट जंगलात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि धुके असतानाही कठुआ, भदरवाह आणि उधमपूर भागात मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू आहे. हा भूभाग अतिशय अवघड असून प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी कसून शोध सुरु आहे. लष्कराचे एलिट पॅराट्रूपर्ससह शोध पथकांना हेलिकॉप्टर आणि UAV निगराणी, प्रशिक्षित श्वान यांच्याद्वारे मदत करण्यात येत आहे. सोमवारी दहशतवाद्यांनी कठुआ जिल्ह्यातील बदनोटा गावाजवळ लष्कराच्या दोन वाहनांवर गोळीबार केला, यात लष्कराचे पाच जवान कामी आले आणि पाच जण जखमी झाले.