अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे आज मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली असताना वादळ सदृश्य वातावरण तयार झाल्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.
Site Admin | August 24, 2024 8:46 AM | अरबी समुद्र | वादळ