महाकुंभ मेळ्यानिमित्त जानेवारी महिन्यात, पुणे विभागातून 80 हजार 177 प्रवाशांनी रेल्वेने प्रयागराजपर्यंत प्रवास केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाला 8 कोटी 42 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे विभागातून आत्तापर्यंत 5 विशेष रेलगाड्या प्रयागराजसाठी सोडण्यात आल्या असून 21 फेब्रुवारीलाही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. आयआरटीसीमार्फत प्रयागराज इथं यात्रेकरूंसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे.
Site Admin | February 11, 2025 10:55 AM | पुणे | प्रयागराज | महाकुंभ मेळा | विशेष गाडी
प्रयागराजसाठी पुणे विभागातून 21 फेब्रुवारीला सोडण्यात येणार विशेष रेल्वेगाडी
