पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित होते. ऑलिम्पिक आणि या स्पर्धेत उतरलेल्या क्रीडापटूंना भारताचा पाठिंबा दर्शवण्याचा या टपाल तिकीट संचामागचा उद्देश असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | August 5, 2024 7:40 PM | #ParisOlympics2024. | Lakshya Sen | Paris Olympics
पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटांचा संच प्रकाशित
