लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारातर्फे आज वार्षिक मुहूर्त सौद्यांचं विशेष सत्र आयोजित केलं जाणार आहे.
या विशेष सत्राबरोबरच नवीन कॅलेंडर वर्ष, संवत 2081ची सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी पावणे सहा ते सहा या दरम्यान आरंभपुर्व तर संध्याकाळी सहा ते सात या वेळेत नियमित सत्र होतील असं एन एस ई च्या निवेदनात म्हंटलं आहे.