पुणे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि त्यामुळे या नद्यांवरच्या धरणांमधून वाढवलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमझल्या पूरपरिस्थितीचा आज आढावा घेतला. जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवायचे आणि नदीकाठच्या सखल भागांमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करायचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. खडकवासला धरणातला विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाला, तर नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच महापालिकेने ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमांद्वारे नागरिकांना खबरदारी घ्यायच्या सूचना द्याव्यात, आणि वेळोवेळी पूरपरिस्थितीची माहिती द्यावी, असं आवाहनही त्यांनी अधिकाऱ्यांना केलं.
Site Admin | August 4, 2024 3:07 PM | ajit pawar | Flood | Pune
पालकमंत्री अजित पवार यांचेकडून पुणे जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा
