देशाच्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं काल जारी केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील प्रगतीत सिमेंट, कोळसा, खनिज तेल, विद्युत, खतं, नैसर्गिक वायु, खनिज शुध्दीकरण क्षेत्र आणि पोलाद अशा क्षेत्रातील उत्पादनांचा एकत्रित ४० टक्के वाटा आहे. पोलाद उत्पादनातील वाढ तीन महिन्यांतील उच्चांक दर्शवत ७ टक्क्यांपेक्षा अधिक असून सिमेंट उत्पादन गेल्या चार महिन्यातील सर्वाधिक साडेपाच टक्क्यावर गेलं आहे.