प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची प्रकृती स्थिर असून ते रुग्णालयातून घरी परतले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आज सकाळी चेन्नई इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डीहायड्रेशन आणि पोटाच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, अशी माहिती रहमान यांच्या बहिणीने दिली आहे.