गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली नजीकच्या जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत १२ नक्षली ठार झाले. त्यात ७ पुरुष आणि २ महिलांचा समावेश असून, सर्वांची ओळख पटली आहे.
या १२ जणांवर मिळून ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईमुळे उत्तर गडचिरोलीत सक्रिय टिपागड एलओएस आणि चातगाव-कसनसूर या नक्षल्यांच्या दोन दलमचा बीमोड झाल्याचं पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांवर नागपूरच्या रुग्णालय़ात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचं नीलोत्पल यांनी सांगितलं.