डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी डॉक्टरांचा देशव्यापी संप

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी पश्चिम बंगाल राज्यसरकार अपराध्यांना पाठीशी घालत असून न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या ४३ डॉक्टरांची बदली तृणमूल सरकारने केली असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी केला.ते आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत बोलत होते. या प्रकरणी समाजमाध्यमांवर आवाज उठणाऱ्यांना पश्चिम बंगाल पोलिसांकडून धमक्या मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे.

 

दिल्लीच्या राममनोहर लोहिया आणि लेडी हार्डिंज रुग्णालयात निवासी डॉक्टर निदर्शनं करीत असून एम्स मधले अध्यापकही त्यात सहभागी झाले आहेत.मुंबईत जे.जे. रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचे डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात निदर्शनं सुरु असून शहरातील काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना या संपात सहभागी झाली आहे. हिंगोलीत डॉक्टर हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ आणि दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर धुळ्यात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा