राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. सरकारने गेल्या अडीच वर्षात विक्रमी १ लाख ८ हजार नोकऱ्या दिल्या आहेत. या सर्व परीक्षा पारदर्शी पद्धतीने पार पडल्या असून लवकरच वर्ग क पदभरती राज्य लोकसेवा आयोगाकडे देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. नवे फौजदारी कायदे आजपासून लागू झाले असून त्या अनुषंगाने पोर्टल तयार करण्यात आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. तसंच, हे कायदे केल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन देखील फडणवीस यांनी यावेळी केलं.
Site Admin | July 1, 2024 5:50 PM | अधिवेशन | देवेंद्र फडणवीस
राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार
