देशातल्या शेअर बाजारात आजही तेजी दिसून आली आणि नवे विक्रम प्रस्थापित झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा ८१ हजार अंकांची पातळी ओलांडण्याचा आणि ८१ हजाराच्या वर बंद होण्याचा विक्रम नोंदवला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पहिल्यांदाच २४ हजार ८०० च्या पलीकडे जाऊन बंद झाला. सुरुवातीची घसरण भरुन काढत दोन्ही निर्देशांकांनी दिवसअखेर तेजीकडे वाटचाल केली. दिवसअखेर सेन्सेक्स ६२७ अंकांची वाढ नोंदवून ८१ हजार ३४४ अंकांवर आणि निफ्टी १८८ अंकांची तेजी नोंदवून २४ हजार ८०१ अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांनी या तेजीला हातभार लावला.
Site Admin | July 18, 2024 7:21 PM | Stock Market
देशातल्या शेअर बाजारात नवे उच्चांक
