डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तटस्थ तज्ज्ञाने सिंधू पाणी कराराच्या संदर्भात भारताच्या भूमिकेचे केले समर्थन

जम्मू आणि काश्मीरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांवर भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या मतभेदांवर सिंधू पाणी करारांतर्गत निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तटस्थ तज्ज्ञाने जाहीर केलं आहे. या तज्ज्ञाने प्रकल्पांच्या आरेखनाविषयी असलेली चिंता विचारात घेण्यासाठी लवाद नेमण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळून लावली आहे. किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांवरील चिंता विचारात घेण्यासाठी तटस्थ तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. तटस्थ तज्ज्ञाने जाहीर केलेल्या निवेदनात, काळजीपूर्वक आणि विश्लेषण केल्यानंतर मतभेदांच्या मुद्द्यांचा मुद्द्यांच्या गुण-दोषांवर निर्णय देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तर या प्रकल्पांशी निगडीत मतभेद सोडवण्याची क्षमता केवळ तटस्थ तज्ज्ञाकडे आहे, अशी भारताची सुसंगत आणि तत्वनिष्ठ भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. तटस्थ तज्ज्ञाने दिलेला निर्णय भारताच्या भूमिकेला समर्थन देणारा आहे असं मंत्रालयानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा