विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आजपासून सुरु होणार आहे. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमधे मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत.
मुंबईत होणाऱ्या या सोहळ्यात भारत निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी, चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ होणार आहे. याच कार्यक्रमात या फिरत्या प्रदर्शन वाहनांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.मुंबई महानगरपालिकेेने २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.