डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठीच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज बैठक होणार

जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठीच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज बैठक होणार आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल रहीम राथेर यांचे नाव यासाठी प्रस्तावित करण्यात आलं आहे. विधानसभा सचिवालयाच्या कामकाजानुसार सकाळी 10.30 वाजता सभागृहाची बैठक होणार आहे.

 

नॅशनल कॉन्फरन्सकडे 41 आमदार असून 90 सदस्यांच्या विधानसभेत मित्रपक्ष काँग्रेसचे 6 आणि सीपीआय-एमकडे एक आमदार असल्याने ही निवड सोपी होण्याची शक्यता आहे. नॅशनल कॉन्फरन्सने उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडे विचारणा केली आहे. भाजपने नरेंद्र सिंह यांची या पदासाठी निवड केली आहे. अध्यक्षांच्या निवडीनंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे अभिभाषण होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा