भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी निरिक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या मुंबईतील आझाद मैदान इथं संध्याकाळी 5 वाजता पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अन्य केंद्रीय मंत्री तसंच रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.