डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची घेतली बैठक

राज्यांना दिला जाणारा करांचा हिस्सा, वित्त आयोग अनुदान आणि वस्तू आणि सेवा कर भरपाई थकबाकीच्या माध्यमातून  केंद्राकडून राज्यांना मिळणारं सहाय्य राज्यांमध्ये विकासाला गती देण्याच्या उद्देशाने प्रेरित असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आयोजित सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होत्या. राज्यांमध्ये भांडवली गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी विशेष सहाय्यता योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी सर्व राज्यांना यावेळी केलं. 

या बैठकीला गोवा, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री तसंच बिहार, मध्य प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि तेलंगणाच्या उपमुख्यमंत्र्यांसह अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थ सचिव टी व्ही सोमनाथन आणि आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा