डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 16, 2024 6:30 PM

printer

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात मोठी घसरण

गेल्या महिन्यात, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर घसरुन १ पूर्णांक ८९ शतांश टक्क्यावर आला. ऑक्टोबरमधे हा दर २ पूर्णांक ३६ शतांश टक्के होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार त्यानुसार खाद्यपदार्थाच्या बाबतीत हा दर ११ पूर्णांक ६९ टक्के दरावरुन ८ पूर्णांक ९२ शतांश टक्क्यावर आला. भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली असून, ती ६३ पूर्णांक ४ शतांश टक्क्यावरुन २८ पूर्णांक ५७ शतांश टक्के दरावर आली. कांद्याच्या दरात ६३ टक्क्यावरुन २ पूर्णांक ८५ शतांश टक्के इतकी मोठी घसरण झाली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा