भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेवर रविवारी लागलेल्या आगीनंतर बोटीवरचा एक कनिष्ठ कर्मचारी बेपत्ता आहे. मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये या बोटीच्या रिफिटिंगचं काम सुरू असताना ही आग लागली होती. बोटीवरील कर्मचाऱ्यांनी गोदीतील अग्निशमन यंत्रणेच्या मदतीनं ही काल सकाळपर्यंत ही आग तातडीनं नियंत्रणातही आणली. त्यानंतर बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्याचं आणि आग लागलेल्या भागाच्या स्वच्छतेचं काम पूर्ण झाल्यानंतरही ही बोट अजूनही तिरपी झाली आहे, खूप प्रयत्न करूनही ती सरळ उभी होत नसल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. भारतीय नौदलानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.