क्षयरोगमुक्त भारत या मोहिमेच्या जनजागृतीसाठी आज नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगणात क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज या उपक्रमाचं उदघाटन झालं. पुढल्या वर्षीपर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्याचं ओम बिर्ला यांनी यावेळी सांगितलं. या विशेष सामन्यात विविध राजकीय पक्षांचे खासदार भाग घेणार आहेत. या सामन्यात दोन संघ असून लोकसभा सभापती ११ या संघाचं नेतृत्व माजी मंत्री खासदार अनुराग ठाकूर करणार असून राज्यसभा अध्यक्ष ११ या संघाचं नेतृत्व केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू करणार आहेत.
Site Admin | December 15, 2024 2:15 PM | Major Dhyan Chand | New Delhi | TB Free India campaign