भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम फायनान्स कंपनीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या माहितीच्या काही विशिष्ट तरतूदींमध्ये असंबद्धता आढळून आल्यामुळे दंडाची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मणप्पूरम फायनान्सची तपासणी केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं काही विशिष्ट ग्राहकांना एकापेक्षा जास्त ओळख क्रमांक दिले होते तसंच त्यांच्या पॅन क्रमांकाची पडताळणी झालेली नव्हती असं आरबीआय नं सांगितलं.