डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 28, 2024 11:12 AM | janral anil chauhan

printer

भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज आहे- सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान

भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज असल्याचं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल नवी दिल्ली इथ सांगितलं. भविष्यातील युध्दनीतीसंदर्भात तीनही सेनादलांच्या तुकडीचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमाला संबोधित करताना ते बालत होते. कृत्रिम बुध्दीमत्ता, मशीन लर्निंग, चोरीसंदर्भातील बदलेल्या तंत्रावर आधारित स्टेल्थ तंत्रज्ञान, अतिजलद शस्त्रस्त्र आणि रोबोटिक्समधील प्रगती भविष्यातील युद्धांचे वैशिष्ट्य असतील, असंही ते म्हणाले. भविष्यातील युध्दनीती हवाई आणि अंतराळ युद्ध, नॉन-कायनेटिक युद्ध, सागरी मोहिमा आणि एकाच वेळी विविध स्तरावर लढव्या लागणाऱ्या तंत्रावर आधारित असेल. अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं या अभ्यासक्रमासंदर्भात दिली आहे. तसंच आधुनिक युद्धक्षेत्रातील गुंतागुंत हाताळण्यासाठी तंत्रज्ञान-सक्षम लष्करी कमांडर्सचे कॅडर तयार करणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा