ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणकर्त्या आंदोलकांच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळ आज राज्य मंत्रिमंडळासोबत बैठक होणार आहे. सरकार या शिष्टमंडळाशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल सकाळी या आंदोलकांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन सरकानं द्यावं, अशी मागणी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल उपोषणकर्त्यांची भेट घेतली. वंचिताच्या मागण्यांसाठी आम्ही उपोषणकर्त्यांसोबत असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
Site Admin | June 18, 2024 8:45 AM | OBC Reservation | ओबीसी | जालना