राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस तसंच गारपिटीचा फटका बसला असून, पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले असल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राज्यातल्या २४ जिल्ह्यांतील ११० तालुक्यांमध्ये २६ ते २७ हजार एकरांवरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळं येत्या पुढील चार-पाच दिवसांत आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल तसंच पीक विम्याचं पुनर्गठन करण्यात येत असल्याचंही कृषीमंत्री कोकाटे यांनी सांगितलं.